माझ्या महाराष्ट्राच्या मातीची काय सांगू तुम्हा शक्ती
इथल्या कणांकनात सामावली आहे सधूसंताची भक्ती.....
महाराष्ट्राच्या मातीची काय सांगू तुम्हा प्रीती
इथल्या मनमानात गूंफली आहेत रेशमी नाती.....
माझ्या महाराष्ट्राच्या मातीचे काय सांगू तुम्हा रूप
संरक्षण करण्या सज्ज इथे उंच च उंच पार्वत खूप ......
माझ्या महाराष्ट्राचा मातीचा काय सांगू तुम्हा वास
इथल्या कणांकाणातून येतो धुप द्रव्यांचा सुवास....
माझ्या महाराष्ट्राच्या मातीचे काय सांगू तुम्हा महत्व
इथल्या दगड धोंडायातही साक्षात परमेश्वराचे आस्तित्व....
माझ्या महाराष्ट्राच्या मातीची काय सांगू तुम्हा कथा
इथला कननकन सांगतो पराक्रमाची गाथा....
माझ्या महाराष्ट्राच्या मातितिल काय सांगू तुम्हा मस्ती
इथली मस्ती देखील घडवते टिळका सारख्या महान हस्ती....
माझ्या महाराष्ट्राच्या मातीची काय सांगू तुम्हा राष्ट्रभक्ति
इथे उदयास आल्या शिवरांसारख्या महाशक्ती.....
माझ्या या प्राणहून प्रिय महाराष्ट्राचा
आहे मला आभिमान
त्यामुळेच करतो त्यालासष्टग प्राणाम.......