Pages

Friday, December 5, 2008

आमचे नेते

माझ्या देशातील नेत्यांची मी काय करणार स्तुती
त्यांचीच तर खुंटलीत मती
माझ्या देशातील नेतेच तर आहेत कौरव
त्यामुळे त्यांचा मी काय करणार गौरव
कौरवा मध्ये देखील होता शिष्टाचार
यांच्यात मात्र दिसतो नुसताच भ्रष्टाचार
भ्रष्टाचारला देखील आसते काही प्रमाण
यांच्या घरात उरले नाही पैसा ठेवायला समान
जनतेची करू म्हणे आम्ही सेवा
सारे मिळून खातात मात्र मेवा
जनतेला मिळत नाही प्यायला साधे पाणी
यांच्या घरात मात्र तेलाचही खाणी
निवडणुकीत म्हणतात आमच्याच निशाणी वर मारा शिक्का
मनात मात्र देशाच्या बर्बादीचा निर्धार पक्का
कितीही मेले तरी हे म्हणतात सगळीकडे किती शांती
त्यामुळेच मी म्हणतो याना हाकलण्याची घडेल का कधी क्रांती ????

0 comments: